आम. नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर ७ जानेवारीला सुनावणी सुनावणी होईपर्यंत पोलीस करणार नाहीत अटक

0
89

 

सिंधुदुर्ग – संतोष परब हल्लाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या भाजप आमदार नितेश राणे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर हाय कोर्टात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आज या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार होती.

नितेश राणे यांच्यातर्फे ऍड. संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली. मात्र सरकारी वकिलांतर्फे आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागवून घेतल्याने या अटकपूर्व जामीन अर्जावर आता ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत पोलीस नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना अटक करणार नसल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here