संतोष परब हल्ल्यातील संशयित आरोपी सचिन सातपुते याला न्यायालयीन कोठडी

0
125

 

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुते याला आज कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी सचिन सातपुते याची पोलीस कोठडी संपल्यानंतर कणकवली न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले होते. संशयित आरोपीच्या वतीने वकील हर्षद साठे यांनी काम पाहिले.

जिल्हा बँक निवडणुकी दरम्यान शिवसैनिक संतोष यांच्यावर कणकवलीत जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. आमदार नितेश राणे यांचा निकटवर्तीय म्हणून सातपुतेची ओळख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here