26 C
Panjim
Saturday, December 3, 2022

संतोष परब खुनी हल्ल्यातील आरोपी राकेश परब कणकवली पोलीसांना शरण

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा खासगी सचिव राकेश परब सोमवारी कणकवली पोलिसांना शरण आला आहे. कणकवली पोलीस त्याची बंद खोलीत चौकशी करत आहेत.

जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबर 2021 रोजी खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पुणे येथील सचिन सातपुते नामक आरोपीला अटक करण्यात आली होती. हा संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले. सचिन सातपुते याच्यासोबत राकेश परब याचे 38 कॉल रेकॉर्ड आढळून आले, या पार्श्वभूमीवर या हल्ल्याप्रकरणी राकेश परब याचा सह आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. सरकार पक्षाचे वकील प्रदीप घरत यांनी जिल्हा न्यायालयात राकेश परब यांच्या कॉल रेकॉर्डचे डिटेल्स सादर केले होते. राकेश परब हा घटना घडल्यानंतर फरारी होता. त्याचा कणकवली पोलिस शोध घेत होते. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी राकेश परब याने धाव घेतली होती, मात्र जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान सोमवारी राकेश परब कणकवली पोलिसांसमोर हजर झाला आहे. त्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी चौकशी केली.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles