मनसे उतरणार जिल्हा बँक निवडणूक रिंगणात मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती विरोधकाची भूमिका बजावत जिल्हा बँकेतील गोलमाल आणणार जनतेसमोर

0
25

सिंधुदुर्ग : जिल्हा बँकेची निवडणूक जवळ येऊ लागताच शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करतोय हे भासविण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधिंकडून केला जातोय. परंतु प्रतिभा दूध डेयरी ने शेतकऱ्यांचे २ कोटी ६५ लाख रुपये देणं ठेवलेले आहेत, ते शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं कोणतंच आश्वासन दिलं जात नाही. जिल्हा बँकेमध्ये उधळपट्टी चाललेली आहे. २०१७ – १८ च्या स्टॅट्युटरी रिपोर्ट मध्ये असणाऱ्या त्रुटी आता आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. आज सगळीकडे संगणकीरकरण झालेले असतानाही जिल्हा बँकेमध्ये प्रतिदिन १०० लोक कामासाठी ठेवलेले आहेत. त्यांच्यावर वर्षाला आठ लाख रुपये वर्षाला खर्च केले जाताहेत. हा जो गोलमाल आहे, तो आम्ही जनतेसमोर आणणार. त्यामुळे जिल्हा बँकेमध्ये विरोधकाची भूमिका बजावत मनसे जिल्हा बँक निवडणुकीत दोन ते तीन उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

 

निवडणुकीत डेयरीचा विषय अडचणीत आणणारा आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतोय हे भासवायला आता गोकुळच्या संचालकांच्या भेटी गाठी घेणं सुरू झालंय. शासकीय डेयरी बंद पाडून गोकुळ डेयरी आणायला हे तत्कालीन आमदार, पालकमंत्री, चेअरमन आणि बँक प्रशासन कारणीभूत आहे. त्यानंतर गोकुळ संघ व्यवस्थित चालत नाही हे कारण देऊन प्रतिभा डेयरी चे उद्घाटन केले गेले. या प्रतिभा डेयरी ने शेतकऱ्यांचे २ कोटी ६५ लाख रुपये देणं ठेवलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात आलेली सबसिडीही हडप केलेली आहे. त्यानंतर जिल्हा संघ ऊर्जितावस्थेत आणण्याकरिता जिल्हा बँकेने गोकुळ संघाला ३५ लाख रुपये कर्ज दिले. हे पैसे मिळविण्याकरिता जिल्हा संघाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आता केवळ गुन्हा दाखल करण्याची बातमी दिली. परंतु अद्यापही कोणता गुन्हा दाखल झालेला नाही आणि ते करूही शकत नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांची दिशाभूल न करता प्रलंबित असणारी रक्कम लवकरात लवकर दिली जावी. अन्यथा जिल्हा बँकेने जिल्हा दूध संघाला कर्ज द्यावं. गोकुळला परस्पर दूध न देता ते संघामार्फत देण्यात यावं. तसेच आधीचे पैसे न दिल्याने अनेक शेतकरी आणि संस्था अडचणीत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा जो लपंडाव चाललेला आहे, तो उघडा पाडण्यासाठी आता मनसे जिल्हा बँक निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here