सत्ताधाऱ्यांनी कोरोना योद्धा डॉक्टरांचे थकलेले पगार द्यावेत – भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली १ कोटी रुपयांची थकीत रक्कम कोण देणार ?; जिल्ह्यातील ५३६ पदे रिक्त केव्हा भरणार ?

0
41

सिंधुदुर्ग – जे डॉक्टर कोविड योद्धे होते,ज्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम केले,त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले.आमच्या पुढाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे.

आरोग्य सेवा बजावणाऱ्या ४६ डॉक्टराना पगार नाहीत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ३ भूलतज्ञ डॉक्टरांचे दोन वर्षे पगार नाहीत.एक कोटी रुपये शासन देणे बाकी आहे.त्या २७ डॉक्टरांपैकी १६ डॉक्टर परतीच्या वाटेवर आहेत.

जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या डॉक्टरांना पगार द्यावेत,अनेक डॉक्टर गेल्यास जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल.

सत्ताधाऱ्यांनी कोरोना योद्धा डॉक्टरांचे थकलेले पगार द्यावेत,अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आरोग्य व्यवस्थेबाबत सत्ताधारी लोकांनी याचे उत्तर दिले पाहिजे.ही सामाजिक बांधिलकी ठेवून जिल्ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे.कोरोना काळात वार्ड बॉय व नर्स यानी काम केलं त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे.

जिल्हा आरोग्य विभागात ५३६ पदे जिल्ह्यात रिक्त आहे,सरकारला आम्ही सूचना केली. सरकारला तरीही तारीख मिळत नाही.एन. आर.एच. एम मध्ये या कर्मचाऱ्यांना नोकरीत घ्यावेत.आरोग्य भरती जिल्हा स्तरावर करा.

१४ वर्षे काम केलेली मुले-मुली आहेत,त्यांना कामावर घ्यावेत.राज्य सरकारचा कंपनीमार्फत राज्य स्थरावर परीक्षा घेण्याचा अट्टहास का?स्थानिकांना न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा.

कंपनीची पोट भरण्यासाठी काम केलं जातं का?जिल्हाधिकारी स्तरावर भरती करावी.आरोग्य कर्मचारी प्रश्न मार्गी लागेल.भरती प्रक्रिया सुधारणा करावी,असे राजन तेली म्हणाले.

राजकारण म्हणून लखीमपूर मध्ये शेतकरी मृत्युमुखी पडले तर राज्य बंद केलं जातं. उद्या जिल्ह्यात आरोग्य सेवे अभावी मृत्यू झाल्यास कोण जबाबदार? असा सवाल राजन तेली यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here