भुवनेश्वर ओरिसा येथे दि.३ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय पातळीरील कला उत्सव २०२३ मध्ये लोकनृत्य स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंबावली केपे येथील श्री चंद्रेश्र्वर भूतनाथ उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सिमरन लक्ष्मण गावकर हीची निवड झाली आहे. या संदर्भात गोवा समग्र शिक्षा यांनी विद्यार्थांची निवड करण्यासाठी राज्यातील विविध विद्यालयांसाठी लोकोत्सव २०२२ अंतर्गत विविध सांस्कृतिक व लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. सिमरन गावकर हीने मुलींच्या गटातील लोकनृत्य स्पर्धेत प्रथम बक्षिस पटकावले. तिला शिक्षक दुर्वेश वाडगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक स्वप्नेश नाईक व व्यवस्थापनाने विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.