सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोन रुग्णांची संख्या 89 वर आज आणखी दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह

0
173

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कोरोन रुग्णांची संख्या 89 झाली आहे. जिल्ह्यात आज दोन रुग्णांचे आहावाल कोरोन पॉजिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील 25 गावांतील 37 वाडय़ांमध्ये कंटेनमेंट झोन आहेत.

जिल्ह्यात एकूण 24 हजार 921 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 579 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 23 हजार 17 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 325 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 2 हजार 138 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 2 हजार 30 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 89 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 938 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 108 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 120 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 67 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये 8 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 7 हजार 351 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण 89 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 8 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 79 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 2 मे 2020 पासून आज अखेर एकूण 70 हजार 77 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
कोवीड – 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्वांना लागू केली आहे. जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, उप जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, कणकवली व शिरोडा, संजिवणी हॉस्पिटल, सावंतवाडी, सुयश हॉस्पिटल, कुडाळ, लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे, नागवेकर हॉस्पिटल, कणकवली, गुरुकृपा हॉस्पिटल, कणकवली, संजिवनी हॉस्पिटल, कणकवली, साईलिला हॉस्पिटल, नाटळ, गोवा मेडिलक कॉलेज हॉस्पिटल, बांबोळी, गोवा अशा 12 रुग्णालयांना लागू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here