22.1 C
Panjim
Friday, January 21, 2022

सिंधुदुर्गात शिवसेनेकडून भाजप सरकारचा निषेध, उत्तरप्रदेशमधील युवतीवरील अत्याचाराचे कणकवलीत पडसाद सरकारविरोधी दिल्या घोषणा

Latest Hub Encounter

सिंधुदुर्ग – केंद्रात व उत्तरप्रदेश मध्ये भाजपा सरकार असूनही तेथे महिला सुरक्षित नाहित. असा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. उत्तरप्रदेश येथे एका दलित युवतीवर नराधमाकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिच्यावर पोलिसांनीच परस्पर अंत्यसंस्कार केले. या घटनेचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले असून जिल्हा शिवसेनेकडून कणकवली येथील शिवसेना कार्यालयासमोर भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तरप्रदेश मधील योगी आदित्यनाथ सरकार विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या युवतीवर झालेल्या अत्याचारानंतरही त्या युवतीच्या कुटूंबियांची परवड थांबली नाही. निर्भया प्रकरणा नंतर महिलांवरील अत्याचार थांबतील अशी अपेक्षा होती. पण भाजपा सरकार महिलांवरील हा अत्याचार थांबवू शकले नाही. महिलांवर होणाऱ्या सामूहिक अत्याचाराच्या घटना येत्या काळात थांबवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी सरकारकडून अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांनी सांगत भाजपाच्या केंद्र उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.

यावेळी वैदेही गुडेकर, माधवी दळवी, नगरसेविका मानसी मुंज, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, कणकवली नगरपंचायत शिवसेना गटनेते सुशात नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, योगेश मुंज, ललित घाडीगांवकर, वैभव मालंडकर, रमेश चव्हाण, राजू राणे, राजन म्हाडगुत, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -