सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ ओशियन सनफीश

0
303

सिंधुदुर्ग – जिल्ह्याच्या समुद्रात पहिल्यांदाच दुर्मिळ ओशियन सन फीश सापडला आहे. मालवण येथील मच्छिमारांना हा दुर्मिळ मासा सापडला आहे. हा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

मच्छिमार मासेमारी करत असताना मालवण मधील दांडी आवार येथील पीटर मेंडीस यांच्या होली क्वीन या नौकेला हा ओशियन सनफिश हा दुर्मिळ मासा आढळून आला. सर्वात जास्त माश्यांची पिल्ले देणारा मासा म्हणून या मासळीची ओळख आहे. या अनोख्या माशाला बघण्यासाठी नागरिकांनी किनाऱ्यावर गर्दी केली होती.

पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर या ठिकाणी हा ओशियन सनफिश हा दुर्मिळ मासा जास्त प्रमाणात आढळून येतो. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हा मासा क्वचितच सापडतो. हाडांची संरचना असलेल्या मत्स्य प्रजातींमधील हा मासा सर्वात वजनदार असून त्याची अंडी देण्याची क्षमतादेखील सर्वात अधिक आहे.

सुमारे २०० ते ६०० मीटर समुद्रखोलीत याचे वास्तव्य असते. जेलीफिश, स्विड, छोटे मासे या प्रकारचे असे सनफिशचे खाद्य आहे. मालवण येथील पिटर मेंडिस यांच्या बोटीवर आढळून आलेला हा मासा २५ किलोचा तर आकाराने लहान होता. मात्र याहीपेक्षा मोठ्या आकाराचे अशा पद्धतीचे मासे समुद्रात आढळून येतात. रत्नागिरी येथील मत्स्यसंशोधन केंद्रात या ओशियन सन फिशच्या हाडांचे अवशेष जतन करून ठेवण्यात आले आहे असे सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी तेजस्वीता करंगुटकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here