सिंधुदुर्गात नव्याने मंजूर झालेल्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये यावर्षीच ऍडमिशन होणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग दौऱ्यात दिली माहिती

0
106

सिंधुदुर्ग – आम्ही फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतो. जिल्हयात मंजूर झालेल्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये यावर्षीच ऍडमिशन होतील. असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. तर नारायण राणे यांना लोकशाहीत टीका करण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना मी उत्तर देणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज नुकसानग्रस्थ भातशेतीची पाहणी करण्यासाठी मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते बोलत होते. भाजपा खासदार नारायण राणे यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने मंजुरी मिळालेल्या शासकीय मेडिकल कॉलेजला परवानगी देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही असे म्हटले होते .यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी यावर जास्त न बोलता यावर्षीच मेडील प्रवेश या कॉलेजमध्ये यावेळी होतील असे सांगितले. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून सरकार व पालकमंत्री जनतेची दिशाभूल करत आहे या राणेंच्या टिकेला उत्तर देताना देखील पालकमंत्री यांनी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, लॅब,ऑक्सिजन प्लांट,मंगेश पाडगावकर स्मारक, मचीन्द्र कांबळी स्मारकला गती दिली, आंगणेवाडी नळपाणी योजना केली ही सर्व कामे राज्य शासनाने केल्याचे आवर्जून सांगितले. तसेच राणे यांना लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे. ते त्यांचे काम करू दे आम्ही आमचे विकासाचे काम करत राहू. असे देखील पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

सिंधुदुर्गात मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजमध्ये यावर्षी ऍडमिशन होतील असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. नारायण राणे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना या लोकशाहीत राज्याच्या, देशाच्या, जिल्ह्याच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार आहे. त्यांच्या टीकेला मी उत्तर देणार नाही. मात्र लोकांच्या बांधावर जाऊन आम्ही विकासकामे करतो आहोत. तरीही ते बोलताहेत याचा मला आनंद आहे. असेही मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here