शिमगोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर दोन नव्या गाड्या

0
186

 

शिमगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून शनिवारपासून धामधूम सुरू होणार आहे. चाकरमान्यांची आतापासूनच गावी येण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. शिमगोत्सव कालावधीत रेल्वेगाडय़ांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन आणखी 2 विशेष हॉलिडे स्पेशल रेल्वेगाडय़ा रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. बांद्रा-उडपी हॉलिडे स्पेशलच्या दोन फेऱया 8 मार्चपासून कोकण मार्गावर धावणार असल्याने चाकरमानी सुखावले आहेत.

रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच एलटीटी-करमाळी या रेल्वेगाडीच्या 2 फेऱयांसह पनवेल-करमाळी हॉलिडे स्पेशल गाडय़ा जाहीर केल्या आहेत. एलटीटी-करमाळी 21 फेब्रुवारीपासून कोकण मार्गावर धावू लागली असून उर्वरित रेल्वेगाडय़ा 6 मार्चपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाने बांद्रा-उडपी हॉलिडे स्पेशलच्या 2 फेऱयांची घोषणा केल्याने बोरिवली, वसई, विरार, भाईंदर, नालासोपारा, गोरेगाव आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱया चाकरमान्यांची यातायात थांबणार आहे. 09011/09012 क्रमांकाची बांदा-उडपी हॉलिडे स्पेशल 8 मार्चपासून धावणार आहे. बांद्रा येथून रात्री 11.55 वा. सुटून दुसऱया दिवशी सायं. 6 वा. उडपीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 9 मार्च रोजी सायं. 7 वा. उडपी येथून सुटून दुसऱया दिवशी दुपारी 3 वा. बांद्रय़ाला पोहोचेल. 19 डब्यांच्या या गाडीला बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, बेंदूर, कुंदापुरा आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

09009/09010 या क्रमांकाची बांद्रा-उडपी हॉलिडे स्पेशल 10 मार्च रोजी बांद्रा येथून रात्री 11.55 वा. सुटून दुसऱया दिवशी सायं. 6 वा. उडपीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी उडपी येथून 11 मार्च रोजी सायं. 7 वाजता उडपी येथून सुटून दुसऱया दिवशी 2.35 वा. बांद्रय़ाला पोहोचेल. 22 डब्यांच्या या गाडीमुळे परतीच्या प्रवासात चाकरमान्यांची चांगली सोय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here