वॉटर स्पोर्टस सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील खा.विनायक राऊत,ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

0
162

 

सिंधुदुर्ग – बंदर विभागाच्या काही नियम अटींमुळे बंद करण्यात आलेले वॉटरस्पोर्ट खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक आ. दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरु करण्यात आले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील वॉटर स्पोटर्सच्या SOP ला मंजुरी देण्यात आली आहे.

समुद्र किनाऱ्यावर चालणारे आणि पर्यटकांना खास आकर्षण असलेले वॉटरस्पोर्ट कोविड काळात बंद ठेवण्यात आले होते. खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत, आ. वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार जिल्हाधीकारी के. मंजूलक्ष्मी यांनी कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यांनतर वॉटरस्पोर्ट सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र बंदर विभागाच्या नियम अटींमुळे वॉटरस्पोर्ट पुन्हा बंद करण्यात आले. यामुळे वॉटर स्पोर्टसवर उपजीविका करणारे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले होते. पर्यटन हंगाम सुरु झाल्याने पर्यटकांना देखील या सोयी सुविधांचा लाभ मिळत नव्हता.

याबाबत खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत, आ. वैभव नाईक, आ. दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधत वॉटरस्पोर्ट सुरु करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. वॉटर स्पोटर्सच्या SOP ला मंजुरी देण्यात आली असून वॉटर स्पोर्टस सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे कोकणवासियांच्यावतीने खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत, आ. वैभव नाईक ,आ. दीपक केसरकर यांनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here