विठ्ठल रखुमाई देवस्थान, धारजेवाडा, कुंडई, मडकई – गोवा येथे इंदिरा एकादशी उत्सव साजरा

0
164

मडकई – दिनांक १३ सप्टेंबर २०२० रोजी श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान, धारजेवाडा, कुंडई, मडकई – गोवा येथे देवस्थान समितीच्या वतीने इंदिरा एकादशी उत्सव भक्ती भावाने साजरा करण्यात आला.

वरील उत्सवा दरम्यान संध्याकाळी कुंडई येथील हनुमान भजनी मंडळाला आमंत्रित खास पाहुणे श्री. दत्तप्रसाद मधुकर नाईक यांच्यातर्फे पखवाज संगीतवाद्य भेट म्हणून देण्यात आले.

या कार्यक्रमास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष श्री विनोद काशिनाथ पोकळे आणि इतर पदाधिकारी व सदस्य तसेच हनुमान भजनी मंडळाचे कलाकार दत्ता नाईक, सुहास रिवणकर, सुशांत नाईक, प्रकाश नाईक, दिलीप नाईक, विशांत नाईक, महादेव पवार, एकानंद गावडे, विनायक नाईक, सदानंद नाईक तसेच ब्रीजेश नाईक, वैकुंठ नाईक आणि विराज मडकईकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here