माजी खासदार निलेश राणे राजकारणातून घेणार संन्यास. सिंधुर्गातल्या कुडाळ मधील दोन नगरसेवकांनी दिले राजीनामे..

0
155

 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे पुत्र निलेश राणे यांनी केलेल्या ट्विट वरून सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे.मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. अशा आशयाचं ट्विट निलेश राणे यांनी केला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर केलेल्या ट्विटमुळे भाजप पक्षामध्ये चर्चांना उधाण आलं आहे एकीकडे निलेश राणे यांनी केलेले ट्वीट भाजप पक्षांतर्गत झालेल्या गटबाजी बद्दल नाराज असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशी मोठी खळबळ उडविणारी घोषणा केली आहे. सक्रिय राजकारणातून कायमची निवृत्ती घेत असल्याचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी मन मोकळे केले आहे.

मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले. कारण नसताना माझ्या सोबत राहिलात, त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटले आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली. त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळाले आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचे मनात घर करून गेले. आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणे वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. दिलगिरी व्यक्त करतो, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

दरम्यान, सिंधुदुर्गतून माजी खासदार निलेश राणे यांचे काही कार्यकर्ते निलेश राणेंना भेटण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तर कुडाळ नगरपंचायत मधील दोन नगरसेवक अभिषेक गावडे
प्राजक्ता शिवलकर यांनी राजीनामा दिलेत. त्यामुळे निलेश राणे समर्थकांमध्ये प्रचंड वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here