29 C
Panjim
Friday, May 27, 2022

मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच – भाजप नेते किरीट सोमय्या सचंयनीच्या गुंतवणूकदारांना १०० दिवसांत न्याय द्या; छोट्या गुंतवणूकदारांना पैसे परत द्यावेत

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – सचंयनी सेव्हिंग घोटाळा संसदेत मी उपस्थित केला होता.१५ वर्षे झालीत,केस रजिस्टर झाली आहे.त्यांनतर दोन महिन्यांपूर्वी आ.नितेश राणे यांनी पुन्हा लक्ष घालायला सांगितले. या केसची एकदाही सुनावणी झाली नाही.आरोपी मोकाट आहे,त्याला फरार घोषित करा,यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली.याबद्दल दिल्लीत दोन वेळा बैठका झाल्या आहेत. मंत्री राणे,डॉ.कराड यांच्यासोबत बैठक झाली.गृहमंत्र्यांनी सचंयनीच्या गुंतवणूकदारांना १०० दिवसांत न्याय द्यावा,यासाठी प्रयत्न करणार आहे.माझे उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे,त्यांनी अनिल परबला वाचवून दाखवावे.

मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच असे खुले आव्हान भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले आहे. ते सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते.

१०० दिवसांत संचयनी घोटाळ्याचा प्रश्न मार्गी लावणार

संचयनी सेव्हिंग घोटाळा मी संसदेत उपस्थित केला होता. २००५ मध्ये यासंबंधी केस फाईल झाली आहे. १५ वर्षांत याबाबत न्यायालयात फक्त तारीख पे तारीख सुरू आहे. एकदाही सुनावणी झाली नाही. या घोटाळ्यात चार आरोपी आहेत, त्यातील एक आरोपी फरार आहे. तो फरार आरोपी जाहीर करून त्याच्यावर अटकेची कारवाई करा. संचयनीच्या मालमत्ता हस्तगत करून ठेवीदारांना पैसे परत करा. केंद्र सरकारने संचयनी प्रकरणी राज्य सरकारकडे स्टेटस रिपोर्ट मागितला आहे. या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई आणि ठेविदारांच्या हितासाठी मोदी सरकार आणि रिझर्व्ह बँकेची मदत घेऊ. मात्र पुढील १०० दिवसांत संचयनिचा प्रश्न मार्गी लावणार, असा इशारा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.

अनिल परब यांनी बेनामी प्रॉपर्टी तयार केली आहे

मंत्रिमंडळात असलेले मंत्री परब यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. अनिल परब यांची हकालपट्टी होरणारच, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आहे. अनिल परब यांनी बेनामी प्रॉपर्टी तयार केली आहे. त्याची चौकशी करावी, असे राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी आदेश दिले आहेत. लोकायुक्त यांनी चार्ज घेतला आहे. या प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. याबाबत राज्य सरकारने ५ पानी अहवाल सादर केला आहे. तरीही अद्याप कारवाई नाही. आता आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ठाकरे सरकारची डर्टी १२ मंत्री नेत्यांची नावे जाहीर केली. त्यात जितेंद्र आव्हाड बारावे आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा ६ सप्टेंबरला राईट हँड असलेल्या सईद खानला हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. इडीला १२ जणांचे पुरावे मी दिले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. साक्षीदारांना, अधिकाऱ्यांना वकील लाच देताना अटक केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, त्यांच्या मुलांवर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

नो डेव्हलपमेंट झोन मध्ये अजून दोन बंगले

नो डेव्हलपमेंट झोन मध्ये अजून दोन बंगले आहेत, मिलींद नार्वेकर यांचा एक रिसॉर्ट उघड झाला होता. आज पुन्हा दुसरा उघड झाला आहे. अनिल परब यांचा १७ हजार ५०० स्क्वेअर फूट रिसॉर्ट आहे. त्यांनी ४५ हजार प्रॉपर्टी टॅक्स भरला. ठाकरे यांना खुले चॅलेंज करतो, शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही. अनिल परब यांचा रिसॉर्ट पडणारच आहे. माझी लढाई अनिल परब विरोधात नाही तर ठाकरे सरकार विरोधात आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img