सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरात नॉथन ब्रॅंडन हे चीनचे जहाज दाखल झाले आहे. लोहखनिज वाहून नेण्यासाठी हे जहाज आल आहे. त्या जहाजावर चिनी कॅप्टनसह २२ कर्मचारी आहेत. दरम्यान कोरोना व्हायरस च्या विषयावरून रेडी गावात घबराट पसरली आहे. मात्र आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून प्रत्येकाने या विषयी कोणती काळजी घ्यावी या बाबत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी रेडी पोर्ट येथे दिली आहे.
चार महिन्यांपूर्वी म्हणजेच २२ ऑक्टोंबर दरम्यान हे जहाज चीनमधून रेडी कडे येण्यासाठी निघाले. रेडी बंदरात हे जहाज दाखल झाल्यानंतर कस्टम्स आणि बंदर विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत जहाजावर जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली. दरम्यान कोरोना व्हायरस पसरण्या आधीच संबंधित जहाज चीनमधून निघाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ते जहाज येथून जाईपर्यंत तपासणी सुरूच राहणार आहे.असे सांगण्यात आले. दरम्यान आज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईनकर यांनी रेडी पोर्टला भेट देऊन तेथील अधिकारी श्री. शेणॉय यांच्याशी चर्चा करू आरोग्या बाबत सूचना केल्या. तसेच पोर्ट वर घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ ,सरपंच रामसिंग राणे उपस्थित होते.
वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनीही रेडी गावाला भेट देऊन कोरोना व्हायरसच्या बाबत आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेतली. या वेळी पोर्ट चे अधिकारी शेणाँय यांनी माहिती देताना सांगितले की, सदर बोट २२ आँक्टोंबर दरम्यान तिकडुन निघाली. तसेच मुंबई येथे जहाजावरील सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र ग्रामस्थांनी अफवांवर विस्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन कांबळी यानी केले आहे.