राष्ट्रवादीचे 3 आमदार स्वगृही परतले, अजित पवार यांच्याकडे एकच आमदार उरल्याचा दावा

0
135

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नॉट रिचेबल असलेल्या चार आमदारांपैकी तीन आमदार आज सोमवारी सकाळी मुंबईत परते आहेत. यात अनिल पाटील व दौलत दरोडा, नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे. दिंडोरी नाशिकचे आमदार नरहरी झिरवळ हे सोमवारी सकाळी दिल्लीहून 4 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांना काल रात्री विमानाने मुंबईत आणले गेले. सध्या आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा, हे हॉटेल हयात येथे आहेत. येथेच पक्षाचे अन्य आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया दुहान आणि धीरज शर्मा यांनी त्यांना दिल्लीहून मुंबईत आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here