गोवा पोलीसानी भाजप सरकारच्या हातचे बाहुले बनू नये, मुख्यमंत्र्याना अटक करुन धमक दाखवा – गिरीश चोडणकर

0
182

 

पणजी – काॅंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांना केवळ मास्क न वापरल्याचे कारण सांगुन अटक करणाऱ्या पोलीसानी, दाबोळी ग्रेड सेपरेटर तसेच इतर अनेक ठिकाणी मास्क न वापरता व व्यक्तिगत अंतर न पाळता कोरोना मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व इतराना अटक करण्याची धमक दाखवावी असे आव्हान काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.

मंत्री बाबू कवळेकर व निलेश काब्राल यानी कुडचडे व केपे येथे कोविड सेंटर सुरू करण्यास विरोध केला होता. परंतु त्या दोघांवर सरकारने कारवाई केलेली नाही.

जर संकल्प आमोणकरांना अटक करणे बेकायदेशीर असेल तर सदर कृती करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे व त्यानी जर चुक केली असेल तर मुख़्यमंत्री , उपमुख्यमंत्री व वीज मन्त्रानेही चूक केली आहे तर त्यांनाही अमोणकरा प्रमाणे अटक करुण कायदा सगळ्यांना सारखा हे जानतेला दाखवुन द्या असे आव्हाहन केले

आज पणजी येथे पोलीस मुख्यालयात काॅंग्रेसचा शिष्टमंडळा बरोबर जाऊन त्यांनी पोलीस प्रमुखांकडे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यानी केलेल्या उल्लंघनाचे पुरावे दिले व तक्रार दाखल केली.

गोव्यातील भाजपची दादागीरी दिवसेंदिवस वाढत असुन, न्याय मागण्यांसाठी जाब विचारणाऱ्याना सरकार छळत आहे तसेच परिस्थीतीनुसार बारीक गोष्टींचे उल्लंघन करणारे मोटारसायकल पायलट व सामान्य लोकांना तालांव देऊन सरकार आपली तिजोरी भरत आहे.

पोलिस प्रमुखांनी आम्हाला पुढील दोन -तीन दिवसांत कारवाई करण्याचे वचन दिले असुन, त्यानी शब्द न पाळल्यास आम्ही आंदोलन तिव्र करणार आहोत व त्याची संपुर्ण जबाबदारी सरकारवर राहणार आहे.

आज चलो आझाद मैदान हा कार्यक्रम आम्ही डी आय जी च्या विनंती वरुन रद्द केला व पोलीस प्रमुखांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, भाजपला जनतेचे पडलेले नसुन ते केवळ आपली प्रसिद्धी करण्याच्या नादात आहेत

गिरीश चोडणकर
अध्यक्ष
गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here