25.8 C
Panjim
Friday, August 19, 2022

सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा आजपासून सुरू

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा आजपासून सुरू झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून ही प्रवासी वाहतूक केली जाईल, असे एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी सांगितले. ते कणकवली येथे बोलत होते.

जिल्ह्यातील पाच एसटी आगारातून या आंतरराज्य बससेवा सुरू होत आहेत. यात सावंतवाडी ते बेळगाव, मालवण ते बेळगाव, देवगड ते बेळगाव, कुडाळ ते विजापुर आणि वेंगुर्ला ते वास्को या गाड्यांचा समावेश आहे. आज सकाळपासून या बस सेवा सुरू झाल्या आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केले आहे.

आजपासून वेंगुर्ला ते वास्को ही गाडी सकाळी सहा वाजता सुटून वास्को येथे सकाळी 9.20 वाजता पोहचेल. परतीसाठी वास्को बसस्थानकातून सकाळी 9:30 वाजता सुटून दुपारी 12.50 वेंगुर्ला येथे पोहचेल. याच प्रमाणे सावंतवाडी ते बेळगाव ही सकाळी 8 वाजता सुटेल. मालवण बेळगाव ही गाडी पहाटे 4.50 वाजता सुटेल. देवगड ते बेळगाव सकाळी 7.15 वाजता सुटेल तर कुडाळ विजापुर ही गाडी सकाळी 6.30 वाजता सुटणार आहे ही गाडी गगनबावडा मार्गे धावणार आहे. असेही रसाळ म्हणाले

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img