28 C
Panjim
Sunday, October 2, 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा विदयार्थी युक्रेन मध्ये अडकले पालकांनी जिल्हा प्रशासनाशी साधला संपर्क

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील सहा विदयार्थी सद्यस्थितीत युक्रेन मध्ये अडकले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून युक्रेन व रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला आहे.

तर अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी किंवा कोणाचेही नातेवाईक युक्रेनमध्ये अडकले असल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्याशी, तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सहाय्याकरिता जिल्हा प्रशासनाचने जरी केला टोल फ्री क्रमांक

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून १८००११८७९७ हा टोल फ्री क्रमांक तसेच जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ०२३६२-२२८८४७ व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे. नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे हेल्पलाईन्स नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली फ़ोन-टोल फ्री 1800118797
फोन – 011-23012113/23014104/ 23017905 फॅक्स 011-23088124
ईमेल- situationroom@mea.gov.in
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी/ संबंधितांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियत्रंण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गच्या ०२३६२-२२८८४७ या हेल्पलाईन क्रमांकावर आणि टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img