सरकारी खात्यानी रिक्त पदे भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मागे

0
136

मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी विवीध सरकारी खात्यानी रिक्त पदे भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मागे घेऊन सदर भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा नोकरीच्या शोधात असलेल्या हजारो युवकांच्या भवितव्याशी व त्यांचे पालक व अवलंबीतांच्या भावनांशी केलेली क्रुर थट्टा आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांत यश मिळवीण्यासाठी भाजपने मागील दोन वर्षात ‘नोकरीचे गाजर’ जनतेसमोर ठेवले. भाजप सरकारला गोमंतकीयाना नोकरी व व्यवसाय मिळवुन देण्यात अजिबात रस नाही हे सत्य आहे.

गोव्यात खाण व्यवसाय सुरू करण्याचे खोटे आश्वासन भाजप देत आला आहे व खाण अवलंबातांची ती फसवणुक होती. केंद्रात सत्ता मिळवीण्यासाठी काळा पैसा परत आणुन जनतेच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख भरण्याचे जसे फसवे नाटक भाजपाने केले, त्याच नाटकाचा प्रयोग गोव्यात खाणींच्या बाबतीत करण्यात आला.

भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शहा यानी भाजपाची आश्वासने ही जुमला असल्याचे मान्य केले आहे.

भाजपचे केंद्र व राज्यातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची व राज्याची आर्थिक घडी विस्कटली असुन, आॅटोमोबाईल्स, रिअल इस्टेट, उद्योग, शेती, पर्यटन अश्या सर्वच क्षेत्रात गंभीर मंदीचे संकट आले आहे. देशातील लाखो लोकाना नोकऱ्यांवरुन काढुन टाकण्यात आले असुन, अनेक उद्योग बंद झाले आहेत.

भाजप सरकार राष्ट्रवाद व देशभक्तीचे फसवे रुपडे लोकाना दाखवुन जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

गोवा सद्या आर्थिक संकटात बुडाला असुन, सरकारकडे कल्याणकारी योजनेचे पैसे सुद्धा वेळेत द्यायला निधी नाही.

आपले सगे सोयरे व केडर यांच्यावरच भाजप सरकारचा वरदहस्त आहे. नोकरी-व्यवसाय तसेच विवीध कंत्राटांचा लाभ केवळ अश्या लोकानाच मिळतो.

मुख्यमंत्री सावंत यानी इतर पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करुन गोवा वैद्यकिय महाविद्यालयात आपल्या नातेवाईकाला दिलेला प्रवेश, भाजपच्या केंद्रिय नेत्याच्या नातेवाईकाला रस्ते, पाण्याची पाईपलाईन, फातोर्डा स्टेडियमचे दुरुस्तीच्या कंत्राटात करोडो रुपयांचा घोटाळा होऊन सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही.

गोवा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलाचे गोव्यातील बिच क्लिनींग कंत्राटात संबंध आहेत, तसेच माजी मुख्यमंत्र्यांच्या एका जवळच्या व्यक्तिस मेरशी येथील कोर्ट संकुलाचे काम जाणीवपुर्वक पुढे ढकलुन, त्याच्या पाटो येथिल इमारतीच्या भाड्यापोटी करोडो रुपये फेडणे अशी अनेक प्रकरणे आहेत.

गोवा पर्यटन मेळाव्याचे काम एनडीए सरकारात असल्याचे सांगणाऱ्या एका स्थानिक पक्षाचा पदाधिकारी अप्रत्यक्ष भागिदार असलेल्या मुंबईच्या कंपनीस सर्व नियम धाब्यावर बसवुन देण्यात आले आहे.

भाजपच्या जुमला राजवटीला जनतेने ओळखले असुन, सरकारला गोमंतकीय युवकांच्या भवितव्याशी खेळायला काॅंग्रेस पक्ष कदापी देणार नाही. लोकांच्या पोटा- पाण्याशी खेळणे सरकारने बंद न केल्यास ते सरकारच्या अंगलट येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here