28 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्युबाधीत २२९ रुग्ण सापडले सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीत संगमेश्वरला १७ जणांना लागण





Must read

1358  new infections, 45 died due to covid-19 in Goa on Tuesday

Panaji: Goa's coronavirus caseload went up by 1358 and reached 1,38,776 on Tuesday, a health department official said.   The death toll mounted to 2,197 as...

कुडाळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी वारंगाची तुळसुली येथे नुकसानग्रस्त घरमालकांना केली आर्थिक मदत

सिंधुदुर्ग - आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्याचा दौरा करत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. वारंगाची तुळसुली कालेलकरवाडी येथील राजन सोमा तुळसुलकर...

CHC Bicholim sets up 71- bedded COVID-19 facility in Keshav Sewa Sadhna premises

Bicholim : At a time when Goa is witnessing a tsunami of COVID cases, primary healthcare provider CHC Bicholim in collaboration with the Collectorate...

Physical & mental wellbeing session conducted for South Goa Police

Panaji : Police are exposed to great amounts of human suffering and violence on a daily basis. Over time this can take a serious...
- Advertisement -

 

मागील काही कालावधीपासून रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्युबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे . जानेवारी ते डिसेंबर यावर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्युची लागण झालेले २२९ रुग्ण सापडले आहेत . वर्षभरात ५३२ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती . संशयित रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याने मलेरिया विभागाने जिल्ह्यातील साथग्रस्त गावांवर लक्ष केंद्रीत केले होते . जिल्ह्यात एकुण सापडलेल्या २२९ रुग्णांपैकी १७२ स्थानिक तर ४९ स्थलांतरित रुग्णांचा समावेश आहे . यामध्ये संगमेश्वर तालुक्यात १७ रुग्णांना तर रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १५४ रुग्णांना डेंग्युची लागण झालेली आढळली .
सन २०१४ मध्ये १८५ जणांना डेंग्युची बाधा झाली होती . २०१५ मध्ये ५५ , २०१६ मध्ये ४३ , आणि २०१७ मध्ये ५८ रुग्णांना डेंग्युची बाधा झाली होती . २०१८ मध्ये देखील अशीच परिस्थिती होती . जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली . या कालावधीत डेंग्युबाधित २२९ रुग्ण सापडले आहेत . या कालावधीत ५३२ रुग्णांची संशयित रुग्ण म्हणून तपासणी करण्यात आली होती . बाधित रुग्णांमध्ये रत्नागिरीत सर्वाधिक १५४ रुग्ण सापडले . खेड मध्ये ३८ पैकी १६ , गुहागर ७ पैकी ३ , संगमेश्वर मध्ये ३५ पैकी १७ , लांजामध्ये २१ पैकी ९ , राजापूर मध्ये ४५ पैकी २७ , दापोली मध्ये ३५ पैकी ३ रुग्णांना डेंग्युची लागण झालेली आढळली .
चालूवर्षी मलेरिया आणि डेंग्यु रोगाला प्रतिबंध बसावा याकरिता आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावागावांत जनजागृती करीत आहेत . मलेरियाची साथ उद्भवलेल्या गावांवर मलेरिया विभागाने विशेष लक्ष्य केंद्रित केल्याने या भागात साथीचा विळखा कमी प्रमाणात आहे . गावागावांत डास फवारणी यंत्रामार्फत फवारणी केल्याने साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे . जिल्ह्यात वर्षभरात हिवतापाचे ६६ रुग्ण सापडले. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे स्थलांतरित होते . ६६ पैकी ४३ रुग्ण स्थालांतरित तर १४ रुग्ण स्थानिक आणि ९ मजूर रुग्ण आहेत . ६६ पैकी दापोली ८ , खेड १ , चिपळूण ३ , गुहागर ९ , संगमेश्वर १५ , रत्नागिरी १९ , लांजा १ , राजापूर १० रुग्ण सापडले आहेत .

- Advertisement -

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article

1358  new infections, 45 died due to covid-19 in Goa on Tuesday

Panaji: Goa's coronavirus caseload went up by 1358 and reached 1,38,776 on Tuesday, a health department official said.   The death toll mounted to 2,197 as...

कुडाळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी वारंगाची तुळसुली येथे नुकसानग्रस्त घरमालकांना केली आर्थिक मदत

सिंधुदुर्ग - आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्याचा दौरा करत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. वारंगाची तुळसुली कालेलकरवाडी येथील राजन सोमा तुळसुलकर...

CHC Bicholim sets up 71- bedded COVID-19 facility in Keshav Sewa Sadhna premises

Bicholim : At a time when Goa is witnessing a tsunami of COVID cases, primary healthcare provider CHC Bicholim in collaboration with the Collectorate...

Physical & mental wellbeing session conducted for South Goa Police

Panaji : Police are exposed to great amounts of human suffering and violence on a daily basis. Over time this can take a serious...

तौत्के चक्रीवादळाचा बागायतीला फटकामी, 3 हजार 375 हेक्टर क्षेत्रावरील बागायतीचे नुकसान

सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. 172 गावांमधील 1 हजार 59 शेतकऱ्यांच्या एकूण 3 हजार 375 पूर्णांक 16 हेक्टर क्षेत्रावरील...