वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्युबाधीत २२९ रुग्ण सापडले सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीत संगमेश्वरला १७ जणांना लागण

0
111

 

मागील काही कालावधीपासून रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्युबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे . जानेवारी ते डिसेंबर यावर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्युची लागण झालेले २२९ रुग्ण सापडले आहेत . वर्षभरात ५३२ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती . संशयित रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याने मलेरिया विभागाने जिल्ह्यातील साथग्रस्त गावांवर लक्ष केंद्रीत केले होते . जिल्ह्यात एकुण सापडलेल्या २२९ रुग्णांपैकी १७२ स्थानिक तर ४९ स्थलांतरित रुग्णांचा समावेश आहे . यामध्ये संगमेश्वर तालुक्यात १७ रुग्णांना तर रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १५४ रुग्णांना डेंग्युची लागण झालेली आढळली .
सन २०१४ मध्ये १८५ जणांना डेंग्युची बाधा झाली होती . २०१५ मध्ये ५५ , २०१६ मध्ये ४३ , आणि २०१७ मध्ये ५८ रुग्णांना डेंग्युची बाधा झाली होती . २०१८ मध्ये देखील अशीच परिस्थिती होती . जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली . या कालावधीत डेंग्युबाधित २२९ रुग्ण सापडले आहेत . या कालावधीत ५३२ रुग्णांची संशयित रुग्ण म्हणून तपासणी करण्यात आली होती . बाधित रुग्णांमध्ये रत्नागिरीत सर्वाधिक १५४ रुग्ण सापडले . खेड मध्ये ३८ पैकी १६ , गुहागर ७ पैकी ३ , संगमेश्वर मध्ये ३५ पैकी १७ , लांजामध्ये २१ पैकी ९ , राजापूर मध्ये ४५ पैकी २७ , दापोली मध्ये ३५ पैकी ३ रुग्णांना डेंग्युची लागण झालेली आढळली .
चालूवर्षी मलेरिया आणि डेंग्यु रोगाला प्रतिबंध बसावा याकरिता आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावागावांत जनजागृती करीत आहेत . मलेरियाची साथ उद्भवलेल्या गावांवर मलेरिया विभागाने विशेष लक्ष्य केंद्रित केल्याने या भागात साथीचा विळखा कमी प्रमाणात आहे . गावागावांत डास फवारणी यंत्रामार्फत फवारणी केल्याने साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे . जिल्ह्यात वर्षभरात हिवतापाचे ६६ रुग्ण सापडले. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे स्थलांतरित होते . ६६ पैकी ४३ रुग्ण स्थालांतरित तर १४ रुग्ण स्थानिक आणि ९ मजूर रुग्ण आहेत . ६६ पैकी दापोली ८ , खेड १ , चिपळूण ३ , गुहागर ९ , संगमेश्वर १५ , रत्नागिरी १९ , लांजा १ , राजापूर १० रुग्ण सापडले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here