26.4 C
Panjim
Thursday, March 30, 2023

रिवोलूशन गोवनतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

पणजी: गेल्या दोन दिवसांपासून रिवोलूशन गोवनच्या कार्यकर्त्यांनी उसगाव,सत्तरी, धारबांदोडा, फोंडा, प्रियोळ , पेडणे ह्या पूरग्रस्त भागांना भेटी घेवून तेथील पूरग्रस्त लोकांना मदत केली. त्यांनी पूरग्रस्त लोकांच्या घरातील व मंदिरातील चिखलाची साफसफाई केली.

रिवोलूशनरी गोवनच्या कार्यकर्त्यांनी गेले दोन दिवस पूरग्रस्त भागातील लोकांना टँकर द्वारे पाणी पुरवठा केला.
रिवोलूशनरी गोवनच्या सालसेत गटाने कडधान्य,फळे पूरग्रस्त लोकांना पुरविली.
उसगाव आणि सत्तरी पूरग्रस्त भागातील सुमारे १०० पेक्षा जास्त घराना रिवोलूशनरी गोवनचे नेते मनोज परब यांनी भेटी दिल्या. त्यांनी त्या भागातील नुकसानीचा व मोडतोडीच्या अहवाल तयार करून त्या भागातील तलाठीना सादर करण्यासाठी रिवोलूशनरी गोवनच्या कार्यकर्त्यांचे गट नियुक्त केले.
रिवोलूशनरी गोवनचे कार्यकर्ते दिवसरात्र पूरग्रस्त लोकांच्या सोबत कार्यरत आहेत. रिवोलूशनरी गोवनचा बार्देश गट उसगाव व सत्तरीच्या गटासोबत लोकांच्या घरातील चिखल साफसफाई करण्यात कार्यरत आहे.
ही मानवनिर्मित आपत्ती आहे.योग्यवेळी त्यांना सावध होण्याचा इ शारा देण्यात आला नाही.तसेच वेळीच त्यांना मदत करण्यात आली नाही. गोवा साधन सुविधा विकास महामंडळाच्या अभियंते व ठेकेदारांच्या गटामार्फत पूरग्रस्त लोकांची घरे उभारणीसाठी सरकारने तातडीने मदत करावी.तसेच त्यांना गणेश चतुर्थी नुकसान भरपाई देण्यात यावी.असे मनोज परब बोलताना म्हणाले.
सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे घरांचे व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले.
धरणाचे पाणी सोडले ते जिवघातकी ठरले.
अनेक तालुक्यात बागायती कृषी उत्पन्नाची मोठ्याप्रमाणात नुकसानी झाली आहे.त्या शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून नुकसान भरपाई द्यायला हवी.लोकांचे उध्वस्त झालेले संसार व हाल पाहून रडू कोसळते.असे मनोज परब पुढे बोलताना म्हणाले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles