27 C
Panjim
Friday, February 3, 2023

माथेरानमध्ये  घोड्यांच्या लीदपासून गॅसनिर्मिती

- Advertisement -spot_img

माथेरानमध्ये पर्यटकांना पॉईंट व इतरत्र फिरविण्यासाठी घोडा हे प्रमुख वाहन आहे. या घोड्यांची लिद सर्वत्र पडते, तिची बाधा पर्यावरणाला पोहोचते. मात्र या लिदीपासून गॅस निर्मिती करण्यात नगरपालिकेला यश आले आहे. या लिदीवर प्रक्रिया करून त्यापासून गॅस निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. माथेरानमध्ये एकूण 462 प्रवासी वाहन घोडे आणि 180 मालवाहू घोडे आहेत. या घोड्यांची रस्त्यांवर पडणारी लिद उचलण्याासाठी नगरपालिकेने कर्मचारी नेमूनसुद्धा या लिदीची योग्य विल्हेवाट लागत नव्हती. ही लीद नगरपालिकेसमोर मोठी डोकेदुखी होती. या लिदीच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळविण्यासाठी कल्चर युक्त फवारणी करून नगरपालिकेने दुर्गंधीमुक्त शहर केले खरे, पण दररोज पडणार्‍या लिदीमुळे शहर बकाल होत होते. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी येथील निसर्गऋण बायोगॅस प्रकल्पात लिदिसाठी स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात आणली. आणि बायोगॅस प्रकल्पात लिदीपासून गॅस निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. सध्या माथेरानमधील महत्वाच्या रस्त्यावर वीज पुरवठा करण्यासाठी या गॅसचा उपयोग होत आहे.

अशी आहे प्रक्रिया

संकलित केलेली लिद पाण्याच्या टाकीत टाकली जाते. पाणी आणि लिद यांचे मिश्रण तयार करून, त्यामधून गवत बाजूला केले जाते. लिद मिश्रित पाणी हे प्री डायजेस्टरमध्ये सोडले जाते. तेथे या मिश्रणावर प्रक्रिया होऊन ते मेन डायजेस्टरमध्ये सोडले जाते. मेन डायजेस्टरमध्ये हे मिश्रण 24 दिवस राहिल्यानंतर गॅस प्रक्रिया सुरू होते. हा गॅस मेन डायजेस्टरमधून डोममध्ये जातो आणि डोममधून हळूहळू तो बलूनमध्ये जमा होण्यास सुरुवात होते.

माथेरानमध्ये लिद ही समस्या खूप गहन होती. यासाठी लिदीपासून गॅस प्रक्रिया होते का याचा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाल्यानंतर प्री डायजेस्टरची 12 फूट उंच टाकी बनवून तिच्यापासून प्रक्रिया सुरू केली. एकावेळेस दीड टन लिद या प्री डायजेस्टरमध्ये राहते. त्यामुळे माथेरान आता लिदीपासून मुक्त होणार आहे.
-रामदास कोकरे, मुख्याधिकारी, माथेरान नगरपालिका

लिदीपासून गॅस निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे. लिदीमध्ये उष्णता जास्त असल्यामुळे गॅसचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील वीज पुरवठ्या व्यतिरिक्त येथील हॉटेलवाल्याना गॅस पुरवठा करून नगरपालिकेला उत्पन्न मिळणार आहे.
-प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles