महाड शिवथर येथे भूगर्भात मोठे आवाज ; प्रशासन अलर्ट मोडवर

0
149

रायगड जिल्ह्यात  महाड तालुक्यात कसबे शिवथर गावात गेले दोन दिवस भूगर्भातून मोठे आवाज असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण आहे. या सगळ्या घटनेनंतर महाडचे प्रांत अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व प्रशासनाने गावात येऊन ग्रामस्थ संवाद साधून ग्रामस्थांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या भागाची पाहणी करण्याकरता सोमवारी भूगर्भ शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आला आहे. ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन टीम M.i.d.c पोलिस  अधिकारी, महाड तहसीलदार साहेब, महाड प्रांत तसेच N.D.R.F टीम यांनी कसबे शिवथर गावाला भेट देवून संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तसेच भूगर्भशास्त्रज्ञ गावाला भेट देवून पुढील तपास करणार आहे  अद्याप कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही.  महाड तहसीलदार प्रांत या सगळ्यावर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान शनिवारी याच परिसरात मोठे आवाज येत असल्याची माहिती या गावातील स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना देण्यात आले आहेत सोमवारी या ठिकाणी भूगर्भ शास्त्रज्ञ भेट देणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरवर्षीच्या पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यातील काही भाग हा दरड कोसळणे भूगर्भात घडणाऱ्या घटना यासाठी काहीसा संवेदनशील बनला आहे. शिवथरघळ गावात सुरुंग फोटो सारखे मोठे आवाज भूगर्भात येत असल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी आपली राहते घरी सोडून सुरक्षित ठिकाणी मंदिर परिसरात आसरा घेतला होता. हे आवाज नेमके कोणत्या कारणामुळे येत आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र या सगळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेच वातावरण आहे. शनिवारीही अशा स्वरूपाचे आवाज झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे

१५ दिवसांपूर्वी रायगड जिल्हयात इर्शाळवाडी दुर्घटनेत अख्खी वाडी डोंगराखाली गाडली गेली जवळपास ऐशी माणसे मृत्यूमुखी पडले मोठा हाहाकार उडाला.या घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा एकदा दरडप्रवण क्षेत्रात सर्व्हे करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमी वर शिवथर येथे येत असलेले भूगर्भातून मोठे आवाज हे ग्रामस्थां च्या जिवाचा थरकाप उडवत आहेत.प्रशासनाने या सगळ्याची गंभीर दखल घेतली असून आज येणार्‍या भूगर्भ शास्त्रज्ञांकडून नेमका कोणता अहवाल दिला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here