मतदान मिळवण्यासाठी सतीश सावंतांची जिल्हा बॅकेच्या अधिकाऱ्यांना “दमदाटी” माजी आमदार राजन तेली यांचा आरोप

0
42

 

सिंधुदुर्ग – आपल्या पॅनलला मतदानात यश मिळण्यासाठी जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत हे अधिकाऱ्यांना मतदान मिळण्यासाठी दमदाटी करीत आहेत.तसेच काही सभासदांना पैशाचे आमिष दाखवत आहेत.

आमच्यातील काही लोक निवडून देऊ नये यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहेत, असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केला.

दरम्यान त्यांच्या या प्रकाराबद्दल आम्ही प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याविषयी तेली म्हणाले या ठिकाणी आपल्याला यश मिळावे यासाठी विद्यमान अध्यक्ष चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. त्या ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दमदाटी करून आपल्याला मतं मिळाले पाहिजे.

यासाठी प्रयत्न करा असे सांगत सांगितले जात आहेत. हा सर्व प्रकार अत्यंत चुकीचा आहे. याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here