पालकमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशी समितीकडून देवगड नगरपंचायतला “क्लीन चीट”

0
50

 

सिंधुदुर्ग – देवगड – जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नगरपंचायतची व पर्यायाने देवगड शहरातील जनतेची बदनामी केली जात आहे. नगरपंचायत वर भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेकडून केले जात आहेत.

मात्र शिवसेनेच्या शहरातील काही पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पालकमंत्र्यांनी देवगड नगरपंचायतच्या कामासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीकडून नगरपंचायतीच्या मार्फत झालेल्या विकास कामांना मध्ये कोणतीही अनियमीतता किंवा भ्रष्टाचार झाला नसल्याचा अहवाल दिला आहे.

या अहवालाची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी यांना देखील संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी पाठवली आहे. अशी माहिती देवगड नगरपंचायत चे गटनेते व माजी उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी दिली.

यावेळी बोलताना श्री चांदोस्कर पुढे म्हणाले, देवगड नगरपंचायत ची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याचे काम शिवसेनेकडून हाती घेण्यात आले. मात्र नगरपंचायत ने केलेली कामे ही योग्यच होती.

हे आता पालकमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने मान्य केले आहे. याबाबतचा अहवाल
७ सप्टेंबर २०२१रोजी दिला आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेकडून जनतेत खोटा प्रचार केला जात असल्यामुळे ही माहिती जनतेला असावी याकरिता आज भूमिका स्पष्ट करावी लागली असेही ते म्हणाले.

शिवसेनेकडून गोडाऊन – पवनचक्की रस्त्याचे दुबार काम, कावलेवाडी रस्ता , स्ट्रीट लाईट अशा कामाच्या तक्रारी केल्या होत्या. सदर तक्रारीत नगरपंचायत च्या कामांमध्ये अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. मात्र या आरोपांचा पालकमंत्र्यांच्या समितीनेच पर्दाफाश केला असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here