एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सावंतवाडीत विद्यार्थी,नागरीक व प्रवाशांचा मोर्चा

0
148

 

सिंधुदुर्ग – एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्‍या महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी आज येथिल एसटी कर्मचारी,नागरीक,विद्यार्थी व प्रवाशांनी जोरदार मोर्चा काढला.

यावेळी एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहीजेत.तसेच तात्काळ एसटी बस सुरू करण्यात यावी, अशा विविध घोषणा देण्यात आल्या.याबाबतचे निवेदन तहसिलदारांना पदाधिकार्‍यांकडुन सादर करण्यात आले.

दरम्यान नगराध्यक्ष संजू परब यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शविला.यावेळी माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर,मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, संतोष भैरवकर, गुरुदास गवंडे, आशिष सुभेदार अभय देसाई,गोविंद मोरये,मंगेश तळवणेकर, तालुक्यातील सरपंच, विद्यार्थी सामान्य नागरीक,एसटी कर्मचारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तात्काळ बसफेऱ्या चालू करण्यात यावे,अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.तर सीमेवर ज्याप्रमाणे सैनिक डोळ्यात तेल घालून संपूर्ण भारतीय जनतेचे रक्षण करतात.त्याचप्रमाणे एसटी कर्मचारी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन प्रामाणिक काम करीत आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचारी,अधिकारी व आमदार, मंत्री यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी येथील बसस्थानकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here