28 C
Panjim
Wednesday, August 17, 2022

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत घपला, भाजपा न्यायालयात जाणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची सिंधुदुर्गात माहिती

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – ९०० पैकी ३०० केंद्रांवर एका तासामद्ये १३८ असं मतदान झालं आहे. असं सांगत पदवीधर मतदार संघात मतदानात घपला झाला असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. याबाबत लवकरच विथ प्रॅक्टिकल पत्रकार परिषद घेऊ आणि सगळ्याचा पोलखोल करू असेही ते म्हणाले. लवकरच आम्ही जनहित याचिका दाखल करणार आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात पाच हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

२०२४ च्या निवडणुकीला काँग्रेस घाबरली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनता केंद्रस्थानी ठेवत अनेक हितकारी निर्णय घेतले. त्या माध्यमातून भाजपा व मोदींना मिळत असलेला पाठिंबा हा काँग्रेसची डोकेदुखी ठरत आहे. हे काम जर असेच सुरू राहिले तर ​२०२४ मधील निवडणुकांमध्ये भाजपाचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. काँग्रेसचे सध्याचे असलेले खासदार एका बसमधून जातील एवढेच आहेत. मंदिर वही बनायेंगे अस सांगत मोदींनी ते पूर्ण केलं, काश्मीर मधील कलम हटवलं २०२४ मध्ये ते एवढेही राहणार नाहीत याची भीती काँग्रेसला आहे. म्हणूनच त्यांचा मोदींना विरोध असल्याचे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला समर्थन देण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे नेतृत्व चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

शेतकर्‍यांची ढाल करून कृषि विधेयकाला विरोध

शेतकर्‍यांची ढाल करून कृषि विधेयकाला विरोध करत आहेत. मोदी सरकारने आणलेले कृषि कायदे हे शेतकर्‍यांच्या जीवनात श्रीमंती आणणारे कायदे आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला दर मिळण्याची हमी या कायद्यामुळे मिळणार आहे. पण देशातील मूठभर शेतकऱ्यांना घेऊन दलालांच्या मदतीने मोदी विरोधक आंदोनल करत आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

कृषि कायद्याला शेतकरी नव्हे तर व्यापारी विरोध करत आहेत

चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच कृषि कायद्याचेही समर्थन केले. ते म्हणाले, मोदींनी आणलेल्या कृषि कायद्याला शेतकरी नव्हे तर व्यापारी विरोध करत आहेत. व्यापार्‍यांना सगळा कृषि माल बाजार समितीमध्येच आणायचा आहे. जेणे करून दलालांचाच फायदा होईल. रूमालाखाली दर ठरेल आणि शेतकर्‍यांच्या हातात तुटपुंजी रक्कम येईल. असे पाटील म्हणाले. विरोधक अफवा पसरत आहेत. कृषि उत्पन्न बाजार समिती बाहेर माल विकला तर शेतकर्‍यांची फसवणूक होईल असे सांगत आहेत. पण मी पण शेतकर्‍याचा मुलगा आहे. आमची अडीच एकर शेती आहे. आम्हाला वेडे समजू नका. तुम्ही आतमध्ये काटा मारता. आम्ही बाजार समिती बाहेर बसून माल विकू आमचा इलेक्ट्रॉनिक काटा लावू आणि फसवणूक होऊ देणार नाही. असे ते म्हणाले.

भाजपाची अधिक ताकद २०२४ मध्ये दिसेल

मोदी सरकारने वर्षाला शेतकर्‍यांना ६ हजार रूपये मिळण्याची तरतूद केली. तसेच शेतमजूरांना ३ हजार रूपये पेन्शनची व्यवस्था केली. शेतकर्‍यांच्या या प्रेमामुळे २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये भरभरून साथ दिली आहे. त्यापेक्षाही अधिक ताकद २०२४ मध्ये दिसेल. म्हणूनच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मोदींना सतत विरोध करत आहेत.

नामांतराचा वाद विकोपाला जाऊन सरकार पडेल असं वाटत नाही

शिवसेनेने गेल्या १३ महिन्यात खुर्चीसाठी अस्मीतेचे आगळे विषय सोडले. सावरकर सोडले, अयोध्या सोडली, हिंदुत्व सोडून दिल त्यामुळे खुर्चीसाठी औरंगाबादचे संभाजीनगर नको औरंगाबाद रहायला हरकत नाही तेही म्हणायला त्यांना हरकत नाही. अशी टीका त्यांनी यावेळी शिवसेनेवर केली. यातून भांडण विकोपाला जातील आणि सरकार पडेल असं मला वाटत नाही कारण काँग्रेसलाही पर्याय नाही आणि सेनेलाही पर्याय नाही असे त्यांनी य्यावेळी सांगितले.

 

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img