नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

0
91

 

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्या प्रकरणी संशयित असलेले आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.

शिवसेनेचे कार्यकर्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर झालेल्या खुनी हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही जणांना अटक झाली.

मात्र आमदार नितेश राणे यांच्यासह मनीष दळवी व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यापैकी आमदार नितेश राणे यांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने नाकारला होता.

त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावर गुरुवारी अंतिम सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here