जो चिनी वस्तू विकत असेल तो देशद्रोही, त्याला बडवा भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांचे वक्तव्य

1
154

 

सिंधुदुर्ग – चीनने कोविड १९ हा विषाणू फसरवून एकप्रकारे विषाणू युद्ध केले.आता तर भारताच्या सैनिकांवर हल्ला केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जो चिनी वस्तू विकत असेल तो देशद्रोही, त्याला रस्त्यावर जनतेने बडवा,असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे.

कणकवली येथील भाजपा जिल्हा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी सरचिटणीस मधुसूदन बांदिवडेकर, रविंद शेट्ये,बबलू सावंत, समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोविड १९ मुळे संपूर्ण जग ग्रासला आहे,चीनची जन्तु निर्मिती ही युद्ध नीती आहे.चीनला लक्षात आले,अमेरिका व युरोप म्हसत्तांचे केंद्र भारताकडे वळले आहे, लोकसंख्याचा उपयोग करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला महासत्ता बनवतील. हे चीनला लक्षात आले, तेव्हाच वूहान शहरात कोविड १९ निर्मिती झाली.त्यावेळी चीनने जन्तु युद्ध केले, हे जगाच्या लक्षात आले. कोविडने अखं जग व्यापून जाईल. जगाच्या अर्थ व्यवस्था कोडमडतील, शासन , प्रशासन व पैसा खर्ची पडेल. त्याचवेळेला चीनने आपल्या देशाच्या सीमा वाढवाव्यात,ही चीनची रणनीती असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला.

व्यापाऱ्यांनी चिनी वस्तू विकू नये…
जागतिक नियम व व्यावसायिक करार आहेत, त्यामुळे देशात चिनी माल येतो. जनतेचा करार नाही,त्यामुळे जनतेने चिनी माल घेऊ नये. व्यापारी असोसिएशनने चिनी वस्तू विकू नये,चिनी वस्तू विकणाऱ्यांना बडवा.आता हिंदु-चिनी भाई,भाई नाही.चीनला भारताची भीती वाटत आहे,३७० काढल्यानंतर चीनची हवा टाईट झाली आहे,त्यामुळेच आता चीन सीमा वाद करत आहे,घुसण्याचा प्रकार आहे. आमच्या सैनिकांना मारले. त्यामुळे भाजपाच्या वतींने प्रत्येक नाक्यावर जिल्ह्यात चिनी वस्तुंची होळी केली जाणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. why chief minister of Maharashtra taking China made Walmart company to car manufacture plant in Talegaon near Pune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here