28 C
Panjim
Thursday, May 19, 2022

एसटीचे स्टेअरिंग आता सेवानिवृत्त चालकांच्या हाती देण्याची तयारी सिंधुदुर्ग विभागातील सेवानिवृत्त ३५ जणांची यादी तयार

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे , या एकमेव मुद्यावर सिंधुदुर्गात सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आता साठ दिवस पूर्ण झाले आहेत . प्रशासनाच्यावतीने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने सेवानिवृत्त चालकांना पुन्हा कामावर हजर करून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

त्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील विनाअपघात सेवा बजावलेल्या व प्रशासनाच्या निकषात बसणाऱ्या ३५ सेवानिवृत्त चालकांची यादी तयार करण्यात आली आहे . कामबंद आंदोलनामुळे एसटीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने पर्याय म्हणून एसटीचे स्टेअरिंग सेवानिवृत्तांच्या हातात देण्याचे निश्चित केले आहे.

मात्र , सेवानिवृत्तांना हजर करून घेताना काही अटी निश्चित केल्या आहेत . सिंधुदुर्ग विभागात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पुन्हा कामावर हजर होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर आपण कामावर हजर झालो तर संपकरी कर्मचाऱ्यांचा रोष आपल्याला सहन करावा लागेल. अशी भीती काही निवृत्त चालकांना वाटत आहे. तर सेवानिवृत्तांना हजर करून घेऊन एसटी वाहतूक रुळावर आणण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत . ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img