25.1 C
Panjim
Tuesday, September 27, 2022

आमदार नितेश राणे यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र भगवत गीता पठण आला समाजवादी पार्टीने केलेल्या विरोधामुळे लिहिले पत्र

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलेले आहे. या पत्रात त्यांनी समाजवादी पार्टीकडून भगवत गीता पठण आला झालेल्या विरोधाचा संदर्भ दिला आहे. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून भगवद्गीता पटनाला होणारा विरोध आपण जुमानणार नाहीत. असेही आमदार नितेश राणे यांनी या पत्रात म्हटले आहे.

 

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी महानगर पालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणच्या ठरावाची सुचना भाजपच्या योगिताताई कोळी यांनी महापौरांना केली होती. मात्र, लगेच समाजवादी पार्टीकडून यावर आक्षेप व विरोध केला जातोय. खरतंर हे दुर्दैवी आणि दुख:द असल्याचे नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मला खात्री आहे की हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून आपण भगवत् गीता पठणला होणाऱ्या विरोधापुढे झुकणार नाहीत. योगिताताई कोळी यांच्या सुचना मान्य करण्यास आपण लगेच निर्देशीत कराल अशी आशा बाळगतो असे नितेश राणेंनी पत्रात म्हटले आहे.

 

काय आहे या पत्रात

महानगर पालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणच्या ठरावाच्या ठरावाची सुचना भाजपच्या योगिताताई कोळी यांनी महापौरांना केली होती. मात्र, लगेच समाजवादी पार्टीकडून यावर आक्षेप व विरोध केला जातोय. खरतंर हे दुर्दैवी आणि दुख:द आहे. ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील योग, ज्ञान जगाने स्वीकारले, अंगीकारले त्यात कोणत्याही धर्माचा अडसर नाही. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यापीठे, तत्त्ववेत्ते आणि विचारवंत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात भगवत् गीता या ग्रंथाला अनन्य साधरण महत्त्व आहे. अमेरिकेतील सेटॉन हॉल युनिव्हर्सिटीत तर भगवत् गीता आणि मॅनेजमेंट अशा पद्धतीचे कोर्सेस शिकवले जातात. संपूर्ण जग तत्वज्ञान ते कॉरपोरेट अशा सर्वच क्षेत्रात भगवत् गीतेचे महत्व मान्य करत आहे. कारण, हा ग्रंथ मानवी कल्याणाचा मार्ग सांगतो असे नितेश राणेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 

भगवद् गीता पठण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. यामध्ये कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. परंतू आपल्याच देशात जर गीता पठणला विरोध होत असेल तर मग विद्यार्थ्यांना औरंजेबाचे “फतवा-एआलमगीरी’ चे पठण करायला लावायचे का? जेणेकरुन मुख्तार अन्सारी सारखी माणसं यांना घरोघरी जन्माला घालता येतील? असा सवालही राणेंनी या पत्रातून केला आहे. भगवत् गीता पठणला होणाऱ्या विरोधापुढे आपण झुकणार नाहीत. योगिताताई कोळी यांच्या सुचना मान्य करण्यास आपण लगेच निर्देशीत कराल अशी आशा बाळगतो असे नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img