30 C
Panjim
Wednesday, January 19, 2022

आज शरद पवार घेणार मोदींची भेट, राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

Latest Hub Encounter

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच, पवार यांची पुढची चाल काय असेल याबाबत त्यांचे मित्रपक्षही खात्री देऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये होणाऱ्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दुपारी १२ वाजता संसदेमध्ये या दोघांची बैठक होणार आहे. ही राजकीय बैठक नसून, यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या पंतप्रधानांना सांगून, त्यांच्यासाठी मदतनिधी देण्याबाबत पवार मोदींशी चर्चा करतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.महाराष्ट्रातील सत्तेचा पेच हा अधिकाधिक गुंतत चालला आहे. त्यात शरद पवारांच्या उलट-सुलट वक्तव्यांनी अधिक संभ्रम निर्माण होत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी युती होण्याची चिन्हे दिसत असतानाच, शरद पवारांनी सत्तास्थापनाबाबत शिवसेना-भाजपला विचारा असे म्हणत सर्वांनाच कोड्यात पाडले होते. तर दुसरीकडे, नरेंद्र मोदींनी राज्यसभेच्या २५०व्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे कौतुक केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते.या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी यांची आजची भेट महत्त्वपूर्ण असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -