सिंधुदुर्गात भटक्या कुत्र्यांचा मोठा उपद्रव, कणकवली नगरपंचायत करणार कुत्र्यांवर नसंबंदीची शस्त्रक्रिया जिल्ह्यात प्रथमच राबवणार उपक्रम

0
143

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अलीकडे अनेकांना या कुत्र्यांनी चव घेतला आहे. या कुत्र्यांच्या बंदोबस्थसाठी जिल्ह्यात कणकवली नगरपंचायतीने प्रथम पॉल उचलले आहे. या कुत्र्यांवर नसंबंदीची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गेले काही दिवस वाढला आहे. यासाठी नगरपंचायतमार्फत ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. कणकवलीतील भटके कुत्रे पकडून त्या कुत्र्यांवर नसंबंदीची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.​ ​यासाठी दोन एजन्सी नगरपंचायतकडे आल्या आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,​ ​आरोग्य सभापती अभिजित मुसळे,​ ​नगरसेवक ऍड विराज भोसलेआदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

​कणकवली शहरातील भटके कुत्रे पकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे टेंडर ५ दिवसांत काढलं जाईल. शासनाचे नियम पाळून ही प्रक्रिया होईल. मुख्याधिकारी यांना माहिती दिली आहे.​ ​त्यांनी निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना केल्या आहेत.​ ​त्यानुसार आम्ही काही संस्थाशी आम्ही संपर्क साधला आहे. सोसायटी फॉर अँनिमल प्रोटेक्शन नागपूर व अँनिमल फ्रेंड वेलफेअर पब्लिक सोसायटी ठाणे या दोन संस्था आहेत.​ ​त्यांच्याशी संपर्क साधला आहे,​ ​यातील कमी दराची निविदा मजूर होईल. त्यानुसार प्रति कुत्रा खर्च होईल.

भटक्या कुत्र्यांना पकडणे व शस्त्रक्रिया करून टँग लावून ज्या भागात पकडले तेथे सोडणार आहे. पकडलेल्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्यामार्फत​ ​मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तशी नाही त्यांनी दिली आहे. नगरपंचायतच्यावतीने पाणी,​ ​जागा, लाईट व्यवस्था करण्यात येईल. नसबंदी केल्याने कणकवलीत भटक्या कुत्र्यांची उत्पत्ती थांबण्याची प्रक्रिया होईल.​ ​त्यामुळे दोन वर्षात याचा इफेक्ट् दिसेल. कणकवली शहरात असलेल्या भटक्या कुत्र्यांचा लवकरच सर्वे करण्यात येणार आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर आक्रमक होणारे कुत्रे शांत होण्यासाठी इंजेक्शन देण्यात येईल. कुत्र्यापासून शहरवासीयांना होणारा त्रास कमी करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांची आहे​, ​असे समीर नलावडे यांनी सांगितले.

शहरात मोकाट जनावरे पकडण्याच्या सूचना दिल्या आहेत. नरडवे रोडवर व इतर ठिकाणी रस्त्यावर थाबत असलेली गुरे ही शहरातील ग्रामीण भागातील आहेत. मात्र वाहतुकीस व नागरिकांना अडथळा होत असल्याने गुरांना पकडून गोपुरी आश्रम येथील कोंडवाड्यात बंदिस्त करण्याच्या सूचना दिल्याची माहिती ​नलावडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here