वरिष्ठ पोलीस अधिकारी कणकवलीत दाखल, राजकीय वातावरण तापले 

0
173

सिंधुदुर्ग – करंजेचे माजी सरपंच तथा शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता कारवाईसाठीचे वातावरण तापू लागले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सहित वरिष्ठ अधिकारी कणकवलीत दाखल झाले होते. दरम्यान आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे सांगत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

 

सोमवारी सकाळीच संजीवकुमार सिंघल, संजय मोहिते यांच्या सहित सर्व वरिष्ठ अधिकारी कणकवली दाखल झाले होते. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांशी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सुमारे पाच तास चर्चा केली. त्यानंतर दुपारी ते कुडाळकडे रवाना झाले. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांना विचारले असता वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्शनसाठी आले होते, असे सांगत संतोष परब हल्लाप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे असे सांगून अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here