रत्नागिरीत ऑनलाईन दारू विक्रीच्या फेसबुक पेजने खळबळ

0
140

 

रत्नागिरी शहरातील मद्यविक्री करणाऱ्या दुकांनाच्या नावे फेसबुक पेज तयार करून ऑनलाईक दारू विक्रीची जाहीरातीने एकच खळबळ उडाली आह़े लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने मद्यपिंची तळमळ वाढली आह़े हीच बाब नजरेसमोर ठेवून मद्यपिंना ऑनलाईन गंडा घातला जात असल्याचा हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर जिह्यात लॉकडाऊन करण्यात आले आह़े त्यामुळे प्रशासनाकडून दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होत़े मात्र 1 महिना उलटूनही दारू न मिळाल्याने तळीरामांची चलबिचल वाढू लागली आह़े याचा फायदा काही महाभाग ब्लॅकने मद्यविक्री देखील करत असल्याचे प्रकार देखील दिसून आले आहेत. तर आता सोशल माध्यमांच्यावापराने मद्यपिंची फसवणूक देखील करण्यात येत आहे.

रत्नागिरीमधील बहुचर्चित दोन दुकानांच्या नावाने फेसबुक पेज तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये मोबाईल नंबद देण्यात आला आहे. या पेजवर घरपोच दारू उपलब्ध होईल अशी बतावणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here