नारायण राणे यांच्या जीविताला धोका – आमदार प्रसाद लाड

0
35

सिंधुदुर्ग – नारायण राणे याना संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांच्या जीविताला धोका असल्याचा आरोप केला आहे. संगमेश्वरमधील गोळवली येथे राणे हे जेवत असताना त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांच्या वैद्यकीय चाचणीही पोलिसांनी परवानगी दिली नाही उलट त्यांच्या हातात जेवणाचे ताट असताना त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात नारायण राणे यांचं जेऊन झाल्यावर त्यांना अटक करा अशी निलेश राणे विनंती करत असतानाही पोलीस ऐकले नसल्याचे ते म्हणाले. याबाबतचा एक व्हिडीओ देखील आमदार प्रसाद लाड यांनी ट्विट केला आहे. तर रत्नागिरी पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी आले मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अटक वॉरंट नव्हता. पोलीस अधीक्षकांकडे आम्ही वॉरंटची मागणी केली. मात्र ते वॉरंट दाखवू शकले नाहीत, राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. पोलीस अधीक्षकच तसं बोलले आहेत. असेही आमदार प्रसाद लाड म्हणाले.

साहेबांचा तुम्ही खून करणार आहात – आमदार लाड यांचा पोलिसांवर आरोप

आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, यात्रा प्रमुख प्रमोद जठार, माजी खासदार निलेश राणे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात ठिय्या देत पोलिसांकडे राणे याना अटक करण्याचा आदेश दाखवा अशी मागणी करू लागले. तर साहेबाना तुम्ही मारणार आहेत. त्यांचा वाटेत तुम्ही खून करणार आहात असा आरोप यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी केला.

राणे याना रुग्णालयात दाखल करण्याची गरज

राणे यांची संगमेश्वर येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांचा ब्लड प्रेशर १६० बाय १०१० असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here