26.6 C
Panjim
Wednesday, June 29, 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातकरी आदिवासीना मारहाण प्रकरणी वनरक्षक,वनपालांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील कातकरी आदिवासी समाजातील महिला व पुरुषांना मारहाण केल्याप्रकरणी वनरक्षक, वनपाल यांच्यासह ५ वन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट १९८९,नुसार ३(१)(आर), ३(२)(व्ही ए) भारतीय दंड संहिता ३२४,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनविभागाच्या पाच आडगीकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

सखू बारक्या पवार हिने दिलेल्या वर्दीनुसार १८ फेब्रुवारी रोजी हा गुन्हा घडला होता. आदिवासी कातकरी समजतील सखू पवार व अन्य पुरुष फोंडाघाट वनक्षेत्रातील वनविभागाच्या जंगलात औषधे गोळा करण्यासाठी गेले असताना सखू पवार ही व गुन्ह्यातील साक्षीदार हे आदिवासी कातकरी समाजातील आहेत हे माहीत असूनही सखू हिला दांड्याने मारहाण करण्यात आली होती. तसेच साक्षीदारांना वनपाल कार्यालयात बोलावून व जंगलात नेऊन दांड्याने मारहाण व शिवीगाळ केली. या गुन्ह्यात वनपाल शशिकांत साटम, तसेच वनरक्षक संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छीन्द्र श्रीकृष्ण दराडे, सत्यवान सहदेव कुबल ( सर्व रा.फोंडाघाट , ता.कणकवली ) यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके करत आहेत

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे गुन्ह्याला फुटली वाचा

या गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी सर्वप्रथम सत्यशोधक सेक्युलर फ्रंटचे ऍड.सुदीप कांबळे यांनी फोंडाघाट येथे कातकरी वस्तीवर जात वस्तुस्थिती समजून घेत पीडित कातकरी बांधवाना धीर दिला होता. आदिवासी कातकरी बांधवाना अमानुष मारहाण करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांविरोधात दाद मागण्यासाठी पीडित कातकरी बांधवांसोबत कणकवली पोलीस ठाणे गाठून कातकरी बांधवांची बाजू लावून धरली होती. अखंड लोकमंच चे नामानंद मोडक यांनीही पोलीस ठाण्यात जात कातकरी बांधवांची बाजू मांडली होती. अखेर या लढ्याला यश आले असून ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खैर झाडे तोडताना पकडून गुन्हा दाखल केल्यामुळे ” त्यांचा ” मारहाणीचा बनाव

फोंडाघाट येथील वनविभागाच्या जंगलातील खैराची झाडे तोडताना पकडून त्यांच्यावर वनअधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या कातकरी बांधवांना मारहाण केलेली नाही. खैर वृक्षतोडी चा गुन्हा दाखल केल्यामुळे मारहाणीचा बनाव केला असल्याची माहिती वनपाल साटम यांनी दिली. कातकरी आदिवासींना वनरक्षकांनी मारहाण केल्याबाबत च्या वृत्ताबाबत वनअधिकाऱ्यांना विचारले असता वनपाल साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी रोजी फोंडाघाट येथील कातकरी समाजातील 3 पुरुष आणि एक महिला फोंडाघाट येथील वनविभागाच्या जंगलात खैर वृक्षतोड करताना आढळून आले होते. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटकले असता 3 पुरुष घटनास्थळावरून पळून गेले तर महिला सापडून अली होती. त्या महिलेमार्फत अन्य साथीदारांची माहिती घेऊन त्यांच्यावर 19 फेब्रुवारी रोजी वनअधिनियम 1927 चे कलम 26 ( फ ) ( ड ) नुसार गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्या महिला अथवा पुरुष कातकरी आदिवासींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली नसल्याचेही वनपाल साटम यांनी सांगितले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img