26 C
Panjim
Monday, November 28, 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळ्यापूर्वी खाजगी घर दुरुस्तीचे कामे सुरू करण्यासाठी परवानगी

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामिण तसेच शहरी भागातील खाजगी स्वरुपाची बांधकामे चालू ठेवण्यास तसेच पावसाळ्यापूर्वी खाजगी घर दुरुस्तीचे कामे सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या बांधकामांच्या परवानगीसाठी ग्रामिण भागासाठी तहसिलदार यांना तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज करावे, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

या कामांसाठी परवानगी देताना पुढील अटी व शर्तींची पुर्तता करणे बंधनकारक आहे. ग्रामिण व शहरी भागातील जी क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत की वगळून चालू असलेल्या बांधकामास परवानगी देता येणार आहे. शहरी व ग्रामिण क्षेत्रामध्ये पूर्वीपासून सुरू असलेल्या बांधकामे पुर्ववत चालू ठेवण्यास परवानगी आहे. तसेच बांधकाम कामगार हे बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास असणे बंधनकारक आहे. नागरी भागात ज्या ठिकामी बांधकाम सुरू आहे त्या बाहेर कामगार जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. ठेकेदारांनी कामागारांच्या जेवणाची व पाण्याची सोय आवारातच करणे गरजेचे आहे. परवानगी घेताना कामगार, मंजूर यांची यादी अर्जा सोबत जोडावी, बांधकामाच्या ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही परवानगी जिल्ह्यात रहिवासी असलेल्या कामगारांसाठी असून परजिल्ह्यातील कामगार आणता येणार नाही याची जबाबदारी ठेकेदारावर राहील. कामाच्या ठिकाणी आवश्यक मास्क, सॅनिटायझर व शारिरीक अंतर तसेच सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. अर्जदाराने साध्या कागदावर याविषयीचे शपथपत्र देणे गरजेजे आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक ते कामगार, मजूर, साहित्य यांची वाहतूक करण्यासाठी तहसिलदार व मुख्याधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात पास देतील. सदर आदेशांचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसेच महाराष्ट्क कोव्हीड – 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 9 नुसार आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img