26 C
Panjim
Friday, September 30, 2022

सिंधुदुर्गात खळबळ, डेल्टा प्लस रुग्ण सापडलेल्या परिसरात स्वॅब देण्यावरून काही काळ गोंधळ

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कणकवली शहरात परबवाडी येथे मिळालेल्या डेल्टा प्लसच्या रुग्णामुळे कणकवली शहरातही खळबळ उडाली आहे. कणकवली परबवाडी येथील कामत श्रुष्टि इमारतीमध्ये बुधवारपासून स्वॅब टेस्टला सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान काही काळ या ठिकाणी नागरिकांच्या विरोधामुळे गोंधळ निर्माण झाला होता. शेवटी नगराध्यक्ष समीर नलावडे दाखल झाले आणि त्यांनी नागरिकांची समाज घातली.

कणकवलीत कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी, नगरपंचायत प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे कर्मचाऱ्यांचे पथक बुधवारी ज्या इमारती मध्ये डेल्टा प्लस चा रुग्ण मिळाला आहे, त्या इमारतीमधील व आजूबाजूच्या इमारतीमधील स्वॅब टेस्ट घेण्यासाठी दाखल झाले. दरम्यान याठिकाणी आरोग्य पथक दाखल झाल्यानंतर येथील काही रहिवाशांनी स्वॅब देण्यासाठी नकार दिला. एवढे दिवस आपण त्यां डेल्टा रुग्णाला होम क्वारंटाईन का केले नाही ? पहिलीच आपण काळजी घेतली नाही ? आता आमचे स्वॅब घेऊन आम्हाला नाहक त्रास का सहन करावा लावताय ? अशा प्रश्नांची बरसात या नागरिकांनी यावेळी केली. तर काही रहिवाशांनी स्वॅब देण्यासाठी सकारात्मकता दर्शवल्याने स्वॅब घेण्यास सुरुवात करण्यात आली.

हा गोंधळ झाल्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे,नगरसेवक संजय कामतेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी उपस्थित राहत समस्या जाणून घेतल्या. यावेळी रहिवाशांची समज घालत याठिकाणी स्वॅब टेस्टला सुरवात केली आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img