सह्याद्रीतल्या वनौषधीची माहिती पुढच्या पिढीला होण्यासाठी लवकरच वैदूंची परिषद घेणार केंद्रीय आयुष मंत्र्यांचा विश्वास ; आडाळीतील वनौषधी प्रकल्पाचे काम मार्च अखेर सुरू करणार असल्याचा दावा

0
109

सिंधुदुर्ग – सह्याद्री खोर्‍यात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. या वनस्पतींचा गुणधर्म जाणणार्‍या वैदूची संख्या मोठी आहे. त्या औषधांची ओळख पुढच्या पिढीला व्हावी यासाठी लवकरच वैदूंची परिषद घेतली जाईल यासाठी आयुष मंत्रालयाची टिम आणून वनौषधी मधील गुणधर्म तपासले जातील, अशी माहीती केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज येथे दिली. दरम्यान दोडामार्ग-आडाळी येथे होणार्‍या वनौषधी प्रकल्पाला येत्या केंद्रीय अंदाज पत्रकात आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे या प्रकल्पाचे मार्च-एप्रिल पर्यत काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे याचा फायदा या भागाला होणार आहे, असेही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

 

श्री नाईक पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विपुल प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. त्यांचा औषधी गुणधर्म माहीत असणारे वैदू जिल्ह्यात आहेत.त्यामुळे त्यांचा मेळावा घेऊन औषधी वनस्पतींचे संकलन झाल्यास आयुर्वेदात त्याचा फायदा होईल. यासाठी मी निश्चितच पुढाकार घेईन, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.दरम्यान आंबोली जागतिक स्तरातील महत्त्वाचे ठिकाण आहे. याठिकाणी चारशे प्रकारचे वनस्पती आढळतात. जिल्ह्यात औषधी वनस्पतींवर वैदूंचा अभ्यासही आहे.असेही ते म्हणाले. दरम्यान केंद्रीय बजेट मध्ये आडाळीतील वनौषधी प्रकल्पाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ती जमीन शासनाने ताब्यात दिलेली आहे. तसेच ते खाते आपल्याकडेच आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला होईल,असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here