25.1 C
Panjim
Saturday, October 1, 2022

संतोष कुमार सावंत ५ हजार मतांनी मये मतदारसंघातून जिंकणार: विजय सरदेसाई

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

मये: भारतीय जनता पक्षाकडे राज्य चालवण्यासाठी व्यवस्थापनच नसल्याने राज्यातील आर्थिक स्थिती कोलमडून पडली आहे असे प्रतिपादन गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले आणि राज्याला सावरण्यासाठी लोकांनी गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस पक्षाच्या युतीला सरकार बनवण्याची संधी द्वावी असे आवाहन केले.

फातोर्डाचे आमदार सरदेसाई शनिवारी मये येथे झालेल्या कार्यकर्ता मळाव्यात बोलत होते. यावेळी पक्षाचे स्थानिक नेते संतोषकुमार सावंत, पक्षाच्या पर्यावरण विभागाचे निमंत्रक विकास भगत आणि इतर नेते उपस्थित होते.

भाजप सरकारने प्रत्येक क्षेत्रात लोकांची लुट चालवली आहे. सरकारी नोकऱ्या विकल्या जात आहेत आणि युवकांना नोकऱ्या हव्या असेल तर त्यांच्या उमेदवारांच्या प्रचाराला फिरण्याची जबरदस्ती केली जात आहे असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणले. ‘‘अशा सरकारला घरी पाठवणे महत्वाचे आहे. या सरकारकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहित, त्या साठी कर्ज घेतला जातो.’’ असे सरदेसाई म्हणाले.

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे सरकार आल्यावर मये मतदारसंघातील विकासकामे केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. ‘‘ हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. भाजपचा आमदार उथे असुनही विकास झालेला नाही.’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

भ्रष्ट भाजपला घरी पाठवण्यासाठी गोवा फॉरवर्डने काँग्रेस सोबत युती केली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस पक्षातील नेताच मुख्यमंत्री बनेल असेही त्यांनी सांगितले.

संतोषकुमार सावंत यांच्या बरोबर मयेतील लोक आहेत, आणि यासाठीच ते ५००० मतांनी जिंकून येणार अशी आपल्याला खात्री असल्याचे ते म्हणाले.

‘भाजप वैफल्यग्रस्त झालेला असून, या निवडणुकीत आपण हरणार या भितीने मते विभागण्यासाठी त्यांनी आम आदमी पक्ष आणि टीएमसीला गोव्यात बोलावले आहे. मात्र त्यांचा हा अजेंडा यशस्वी होणार नाही.’’ असे ते म्हणाले.

संतोषकुमार सावंत यांनी यावेळी बोलताना भाजपावर टिकास्त्र सोडले. या मतदारसंघाचा काहीच विकास झाला नसल्याचे ते म्हणाले. ‘‘आता इथे बदल आणण्याची आवश्यकता आहे. आम्ही लोकांच्या जमनीचा आणि इतर प्रश्न आहेत ते सोडवू.’’ असे ते म्हणाले.

विकास भगत यांनी यावेळी बोलताना विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि त्यांनी विधानसभेत लोकांच्या प्रश्नाला वाचा कशी फोडली त्याची उदाहरणे दिली. ‘‘विजय सरदेसाई गोव्यासाठी चांगले काम करत असल्याने, त्यांना त्रास देण्यासाठी फॉर्मेलिनचा विशय काढण्यात येतो. भाजप सरकारला हिंमत असेल तर त्यांनी फॉर्मेलिनचे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.’’ असे ते म्हणाले.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img