शिवसेना आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

0
150

सिंधुदुर्ग- जिल्हा शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे शिवसेना आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबी कडून आज चौकशी करण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता ठाकरे गटाच्या निष्ठावंत आमदारांवर चौकशीचा फास आवळला जात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आणि मधल्या सत्तांतराच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीच्या पथकाकडून आज कणकवली शासकीय विश्रामगृहावर चौकशी करण्यात आली. याबाबतचा तपशील एसीबी कडून देण्यात आला नसला तरी वैभव नाईक यांनी अशा कितीही चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत असे म्हटले आहे.

दरम्यान एसीबी चे पोलीस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी वैभव नाईक यांना 12 ऑक्टोबर पर्यंत खर्च आणि मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे लेखी पत्र यावेळी दिले आहे.

शिवसेना आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया आली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत राहिलेल्या आमदारांवर दबाव आणण्याचा प्रकार घडत आहे. आपल्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खर्चाचे विवरण पत्र सादर करण्याचे लेखी पत्र दिले आहे. आपण आजवर कोणताही घोटाळा केलेला नाही. त्यामुळे एसीबीने मागितलेली माहिती लवकरच आपण सादर करू असे ते म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here