26 C
Panjim
Friday, January 27, 2023

महिलांना रोजगार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील निधीत दहा टक्क्यांची वाढ

- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग : महिला व बालविकास विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा रोजगाराच्या दृष्टीने महिलांना लाभ मिळावा, यासाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक असून जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील १० टक्के तरतुदीत वाढ करून वाढीव निधीची मागणी करणारा ठराव पार पडलेल्या महिला व बालविकास समिती सभेत करण्यात आला.

जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा देवगड तालुक्यातील कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या सभागृहात सभापती शर्वानी गावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

जिल्हा परिषद स्व उत्पन्न निधी मधून महिला व बालविकास विभागामार्फत महिला लाभार्थ्यांना विविध योजनांतर्गत लाभ दिले जातात. यासाठी या विभागाकडे प्रस्तावही प्राप्त असून आजच्या समिती सभे समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते.

यावेळी जिल्ह्यात काही ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने संबधित गावातील लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना वगळून अन्य लाभार्थी प्रस्तावांना सभेत मान्यता देण्यात आली. तसेच ज्या भागात आचारसंहिता लागू आहे.

तेथील लाभार्थ्यांना आचारसंहिता संपुष्टात आली की त्यांचे प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याची माहिती संतोष भोसले यांनी सभेत दिली.

आजच्या सभेत महिला व बालविकास विभागाच्या सन २०२१-२२ च्या वार्षिक आराखड्याला आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. जिल्ह्यात ९६३ कमी वजनाची तर ९३ कमी वजनाची बालके असून त्यांना सर्वसाधारण वजन श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

विशेष घटक योजना साठी २६ प्रस्तावाचे उद्दिष्ट असून केवळ ३ प्रस्तावच प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी आणखी प्रस्ताव सादर करण्याची सूचना सभेत करण्यात आली.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles