ओला दुष्काळ पडल्याने शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज घोषित केले. पण याच पावसामुळे मच्छिमारांचेही अतोनात नुकसान झाले. त्यामुळे राज्यपालांची मच्छिमारांनाही मदत जाहीर करावी. ती न केल्याबद्दल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने नाराजी व्यक्त केली आहे. २१ नोव्हेंबर हा जागतिक मच्छिमार दिन आहे. त्यानिमित्ताने राज्यपालांनी मदत घोषित करावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे. याबाबत कृती समितीचे सचिव किरण कोळी यांनी सांगितले की, ‘यंदा पावसाचा जोर अधिक व सातत्याने अरबी समुद्रात चक्रीवादळे असल्याने मच्छिमाराचा चार महिन्यांचा काळ वाया गेला. त्यामुळे मच्छिमारांची स्थिती भीषण आहे. त्यांचेही शेतकऱ्यांसारखेच नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांनाही तात्काळ मदत जाहिर करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल सचिवालयाने त्या संबंधीचे पत्र मत्स्य व्यवसाय विभागाच्या सचिवांना पाठवले आहे.’
Home National News महाराष्ट्रातील अवकाळीने त्रस्त मच्छिमारांना हवी मदत, राज्यपालांवर व्यक्त केली नाराजी