सिंधुदुर्ग- जिल्ह्यामध्ये थकित विज बिलांपैकी सुमारे ५ कोटी रुपये विद्युत वितरण कंपनी जवळ आले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी देऊन मार्च २०२१ पर्यंत थकीत असलेल्या सर्व वीज ग्राहकांची कनेक्शन तोडण्यात येतील असेही त्यांनी सांगितले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये विद्युत वितरण कंपनीच्या वीज ग्राहकांमध्ये थकीत वीज बिलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत कोरोना महामारीमुळे विद्युत वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केला होता.
मात्र कोरोना प्रादुर्भाव आत कमी झाल्यानंतर थकित वीज बिल भरणा करण्याकरिता ग्राहकांपर्यंत विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी गेले मात्र ग्राहकांकडून वीज बिल भरण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर महावितरण कंपनीला थकीत वीज बिल ग्राहकांच्या वीज कनेक्शन तोडण्या पर्यंतचा निर्णय घ्यावा लागला, सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ५४ कोटी रुपये थकीत वीज बिले आहेत यामध्ये घरगुती, वाणिज्य तसेच उद्योजक यांचा समावेश आहे.
आता मार्च २०२१ पर्यंत ज्या ग्राहकांची थकित बिले आहेत त्या सर्व ग्राहकांची वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला असल्याचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी सांगितले दरम्यान या थकित वीज बिलाचा मधून सुमारे ५ कोटी रुपये विद्युत वितरण कंपनीकडे जमा झाले आहे असेही त्यांनी सांगितले.