कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, कणकवली बाजारपेठ सहा दिवस बंद ३० जून पर्यंत राहणार बंद

0
307

 

सिंधुदुर्ग – कणकवली बाजारपेठ ३० जुन पर्यंत सहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघांनी घेतला. कणकवलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे स्वयंपूर्तीने बंद ठेवण्यात येणार आहे. असा निर्णय व्यापारी संघाने घेतला आहे.

मेडिकल दुकाने,दूध विक्री व बेकरी सकाळी व संध्याकाळी २ तास सुरू राहणार आहेत. हा निर्णय कणकवली व्यापारी,कणकवलीकर नागरिक आणि विविध संघटना यांनी घेतल्याची माहिती व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत यांनी नगरपंचायत बैठकीत दिली.

कणकवली शहर आणि लगतच्या गावात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठे सुरू राहिली तर कम्युनिटी स्प्रेडिंग होण्याची भीती आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कणकवली नगरपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत व्यापारी संघाने एकमुखाने बाजारपेठ बंद ठेवायचे ठरवले. आज या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here