26 C
Panjim
Wednesday, May 18, 2022

आमदार नितेश राणे यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्याचा तयारी सुरू जामीन अर्जावर 3 वाजता जिल्हा न्यायालयात होणार सुनावणी

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील संशयित भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर आज, शनिवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्याचा तयारी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी जिल्ह्यातील डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखी खाली नेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान कालच तातडीने नितेश राणे यांच्या वकिलांनी आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या जामीन अर्जावर शनिवारी दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआ रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळ पासून सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत.

त्यांना वैद्यकिय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दुपारनंतर आणण्यात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळी सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांन न्यायालयाने दि. 18 फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकृतीचे कारण पुढे करुन राणे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img